सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Tuesday, November 17, 2009

वंदे मातरमला भाषिक वादात अडकविण्याचा छुपा प्रयत्न

'ऑल इंडिया शिया पर्सनल लो बोर्डाने' नुकतीच केंद्र सरकारकडे 'वंदे मातरम' या गीताचे उर्दूमध्ये भाषांतर करावे अशी मागणी केली आहे. बोर्डाच्या मते तसे केल्यास सामान्य मुस्लिमांना 'वंदे मातरम' या गीताचा अर्थ समजणे सोपे होईल आणि त्यानंतर ते या गीताचे गायन करायचे की नाही ते ठरवू शकतील. वर वर पाहता बोर्डाचे कारण पटण्यासारखे आहे. वंदे मातरमचा अर्थ उर्दू भाषेत उपलब्ध व्हावा एवढीच भावना जर या मागणीपाठीअसेल तर त्यात आक्षेप असण्याचे काही कारण नाही. उर्दूच नव्हे तर सर्वच भारतीय भाषांमध्ये 'वंदे मातरम' सारख्या प्रेरक गीताचा अर्थ उलगडून सांगणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी केंद्र सरकार कडे डोळे लावण्याचे काय कारण? आजवर अनेकदा 'वंदे मातरम' वरून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. यादरम्यान एकही उर्दू विद्वानाला हे काम करावेसे का वाटले नाही? देशातीलच नव्हे तर जगभरातील सर्वभाषिक हिंदू 'वंदे मातरम' विषयी आदर बाळगतात. त्या सर्वांनाच या गीतातील प्रत्येक शब्दाचा अर्थ माहित आहे असे नाही. मग भारतीय मुस्लिम नेत्यांना याचे वावडे का वाटावे? म्हणजेच हा वाद भाषाविषयक नसून राष्ट्राभक्तीच्या भावनेशी संलग्न आहे असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.
अनेकांचा असा 'गैर'समज आहे की, विदेशी भाषा आहे. मात्र उर्दू ही देखील मूळ भारतीय भाषाच आहे. तुर्की सत्ताधीशांनी भारतीय सैनिकांशी व अन्य प्रशासनिक अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याकरीता तयार केलेली भाषा म्हणजे 'उर्दू'. या भाषेवर फारसी, तुर्की, अरबी व हिंदी भाषेचा प्रभाव आहे. या भाषेचा प्रसार भारतीय उपखंडातच मोठ्या प्रमाणात झाला. प्रचलित भारतात व पाकिस्तानातच या भाषेला 'राजभाषेचा' दर्जा आहे. अतिशय रसाळ भाषा म्हणून हिचे वर्णन केले जाते. उर्दू मध्ये बरेच अभिजात साहित्य सुद्धा उपलब्ध आहे. या भाषेचा दु:स्वास करण्याचे खऱ्या भारतीयाला काहीच कारण नाही.
मात्र या देशातील अन्य भाषांचा आदर मुस्लिमांनीही केला तर काय बिघडले? पण ही भाषा जणू एका धर्माची अधिकृत भाषा असा आभास निर्माण करण्याचे षडयंत्र काही मंडळी रचत आहेत असेच दिसते आहे. सध्या भारतात सुमारे १६ कोटी मुस्लिम रहातात. यातील किती मुस्लिमांची मातृभाषा 'उर्दू' आहे याचे नेमके उत्तर देणे मुस्लिम नेत्यांना सुद्धा कठीण आहे. खर तर भारतातील बव्हंशी मुस्लिमांचे पूर्वज हे भारतीय अथवा हिंदूच असल्यामुळे त्यांची नाळ ही स्वाभाविकपणे भारतीय संस्कृतीशी जोडली गेली आहे. बंगाली मुस्लिम हे बंगाली भाषेचा अभिमान बाळगतात. केरळी मुस्लिम व्यवहारात 'मल्याळम' भाषेचाच वापर करतात. कोकणी मुसलमान 'कोकणी'चा वापर करतात. एखाद्या व्यक्तीवर अथवा समाजावर एखादी भाषा लादायचा प्रयत्न केला असता काय होते याचा पुरावा म्हणजे बांग्लादेशाची निर्मिती होय. भारतीय मुस्लिम पुढाऱ्यांनी नेतृत्व करताना अशी उदाहरणे अभ्यासण्याची नितांत गरज आहे.

'विविधतेतून एकता' हे भारतीय गुणवैशिष्ट्यच या नेत्यांना जाचत असावे. नाहीतर 'वंदे मातरम' चे भाषांतर करा अशी मागणीच त्यांनी केली नसती. खरे तर मुस्लिमांचा धर्मग्रंथ 'कुरआन ए शरीफ' हा ग्रंथ मूळ अरबी भाषेत आहे. आज शेकडो वर्षांनंतरही तो अरबी भाषेतूनच शिकवला जातो. त्यात काय लिहिले आहे याचा अर्थ समजून घेण्यासाठी सर्व जगातील मुस्लिमांना अरबी शिकवले जाते. अपवाद फक्त 'तुर्कस्तान'चा या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारक व तुर्की राष्ट्रवादाचे उद्गाते 'केमाल पाशा' यांनी त्यावेळच्या प्रस्थापितांना नाकारत पवित्र 'कुरआन ए शरीफ' चे तुर्कीत भाषांतर करवले. भारतीय मुस्लिम नेते अशी मागणी करायचे तरी धाडस दाखवतील काय?

याला प्रतिवाद केला जाईल की,'कुरआन ए शरीफ' हा आमचा धर्मग्रंथ आहे. आमच्या श्रद्धेचा विषय आहे. मग 'वंदे मातरम' यांच्या श्रद्धेचा विषय होऊ शकत नाही का? हा देश आमचाही आहे असा दावा करताना या देशाचे गुणगान करताना लाज कसली?

Thursday, November 5, 2009

"वंदे मातरम्" ला विरोध कशासाठी??


"वंदे मातरम्" ला विरोध कशासाठी??

गेले काही वर्ष आमच्या गांधी प्रणित अहिंसावादी देशात वैचारिक हिंसा सुरु आहे. जागतिक इतिहासाच्या अग्रभागी झळकणाऱ्या काही संघर्षात 'भारतीय स्वातंत्र्यलढा' अगदी ठळकपणे दिसतो. अनेक पाश्चात्य व काही भारतीय पंडितांच्या मते हा संघर्ष अवघा १५० वर्षच चालला. इंग्रजांनी भारतात आपले पाय रोवून सत्ता हस्तगत केली त्यानंतरच म्हणे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली, आणि १९४७ साली भारत स्वतंत्र झाला !!

हा इतिहास खोटा आहे अस नाही पण अर्धसत्य नक्कीच आहे. मुळात पारतंत्र्याची व्याख्या स्पष्ट असली म्हणजे, स्वातंत्र्याचा अर्थ समजणे सोपे होते. परकीयांचे शासन हीच पारतंत्र्याची व्याख्या असेल तर सुलतान व मुघल भारतीय वंशाचे होते काय? सिद्दी, विजापूरकर आदिलशहा, निजामशाहा यांचे पूर्वज भारतीय होते काय? मग त्यावेळी आम्ही स्वतंत्र होतो हे तरी कसे मान्य करायचे? बर जुलमी शासनसंस्था हा पारतंत्र्याचा निकष असेल तर अल्लाउद्दिन खिलजी पासून औरंगजेबापर्यंतच्या सम्राटांनी असे काय पराक्रम केले की त्यामुळे आपण मानावं की आम्ही त्यावेळी स्वतंत्र होतो?

या इतिहासातच आमच्या अध:पतनाची खरी बीजे रोवली आहेत. आमचा खरा स्वातंत्र्यलढा सुरु केला, तो विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हरिहर आणि बुक्क या 'आमच्या राजांनी'. त्यांचा वारसा पुढे महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराजांनी चालवला!! मात्र आमच्या सध्याच्या शासन व्यवस्थेचे शिल्पकार पंडित (?) नेहरू यांना मात्र हे महापुरुष वाट चुकलेले देशभक्त वाटले. "यथा राजा, तथा प्रजा" या न्यायाने सध्याच्या पिढीलाही काहीसं असचं वाटू लागलंय. नाहीतर "वंदे मातरम्" धर्माच्या आड येते असे सांगून या राष्ट्रगीताला विरोध करणाऱ्यांना इतके धैर्यच झाले नसते.

सध्या आपण म्हणत असलेले "वंदे मातरम्" हे गीत खरे ६ कडव्यांचे आहे. भारतमाता ही प्रत्यक्ष दुर्गामाता आहे असे मानून तिच्या गुणांची स्तुती या गीतात केली आहे!! दुर्गामाता असुरांचे (खल प्रवृत्तीचे) निर्दालन करते अशी हिंदू बांधवांची श्रद्धा आहे. पुराणातले असूर आणि सध्याच्या भारतीय मुसलमानांचे पूर्वज आणि ते स्वत: यांच्यात असलेल्या कमालीच्या साधर्म्यामुळेच ते "वंदे मातरम्" या गीताला विरोध करत असावेत का असा प्रश्न निर्माण होण्यास चांगलाच वाव आहे.

ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाचे पालनपोषण करते, अगदी त्याचप्रमाणे ही भारत नामक पुण्यभूमी देखील आम्हाला आधार देते, आमचे पालनपोषण करते. जर तिला मातेसमान मानून तिची स्तुती केली तर कोणाच्या (अगदी देवाच्या सुद्धा) पोटात दुखायचे काय कारण? पण आमच्या भारतीय मुसलमानांच्या पोटात दुखतंय!! ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावर इलाज करायचे ते तर स्वत:च बेजार आहेत.

स्वामी विवेकानंदांच्या जीवनप्रसंगातली एक गोष्ट आहे. जपान मार्गे अमेरिकेकडे रवाना होत असताना स्वामीजींची काही प्रवचने टोकियो शहरात सुद्धा झाली. शहरातले प्राचीन, भव्य असे बौद्ध पेगोडे पाहून अतिशय प्रफुल्लीत झालेल्या विवेकानंदांनी जपानी युवकांसमोर झालेल्या एका भाषणानंतर त्यांना प्रश्न केला, " तुम्ही सगळे अहिंसावादी बुद्धाचे अनुयायी आहात. मात्र जर तुमच्या देशावर परकीयांचे आक्रमण झाले तर तुम्ही काय कराल? त्या तेजस्वी तरुणांनी तत्काळ उत्तर दिले, इथे असलेल्या सगळ्या बुद्ध मूर्ती धातूच्या आहेत. आम्ही त्या वितळवून त्यांची शस्त्रे बनवू, आणि त्या आक्रमकांचा पराभव करू." या उत्तराने विवेकानंद सुद्धा अचंबित झाले. काय ही राष्ट्रनिष्ठा ?? जिच्यापुढे प्रत्यक्ष देव सुद्धा नगण्य ठरावा?

खरे तर भारतीय मुसलमानांचे पूर्वज मूळ भारतीय (हिंदू), या सगळ्या मुसलमानांना आमच्या देशाचाच आधार आहे. मग देशाचे गुणगान करताना यांना लाज वाटण्याचे काय कारण? देशाची स्तुती केल्यामुळे जर तुमच्या धर्माचा अपमान होत असेल तर तुमचा धर्म इतका लहान आहे असे दिसते. इस्लामच्या आधारावर जन्माला आलेल्या पाकिस्तानकडे ही मंडळी उघड्या डोळ्यांनी का पाहत नाहीत? तालिबानींच्या हातून मरणाऱ्या अल्लाच्या बंद्यांना आज स्वतःच्या जीवितासाठी अवलंबून राहावे लागते ते, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या ख्रिस्ती देशांवरच आणि यांना मारणारे असतात तालिबानी. जे स्वतःला अल्लाहचे प्रचारक म्हणवतात!! या भारताने आपल्याला काय कमी दिले, याचा विचार इथे राहणारे मुसलमान केव्हा करणार? खर तर डोळ्याला झापड लावून फिरणाऱ्या या मुर्खांना सत्याची जाणीव करून द्यायची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. पण त्याच शासनाचे गृहमंत्री जेव्हा "वंदे मातरम्" ला विरोध करणाऱ्यांच्या मंचावरून आपल्या अकलेचे ओंगळवाणे प्रदर्शन करतात, तिकडे दोष कोणाला द्यायचा?This Article is Published by 'Tarun Bharat, Mumbai.'

Tuesday, November 3, 2009

Article's 1'st page

page 02

page 03

page 04

page 05

page 06

page 07

page 08

page 09

page 10

page 11

page 12

page 13