सुस्वागतम् !!!!!!!!!

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं बालादपि शुकादपि । अयुक्तमपि न ग्राह्यं साक्षादपि बृहस्पतेः ॥

Tuesday, November 17, 2009

वंदे मातरमला भाषिक वादात अडकविण्याचा छुपा प्रयत्न

'ऑल इंडिया शिया पर्सनल लो बोर्डाने' नुकतीच केंद्र सरकारकडे 'वंदे मातरम' या गीताचे उर्दूमध्ये भाषांतर करावे अशी मागणी केली आहे. बोर्डाच्या मते तसे केल्यास सामान्य मुस्लिमांना 'वंदे मातरम' या गीताचा अर्थ समजणे सोपे होईल आणि त्यानंतर ते या गीताचे गायन करायचे की नाही ते ठरवू शकतील. वर वर पाहता बोर्डाचे कारण पटण्यासारखे आहे. वंदे मातरमचा अर्थ उर्दू भाषेत उपलब्ध व्हावा एवढीच भावना जर या मागणीपाठीअसेल तर त्यात आक्षेप असण्याचे काही कारण नाही. उर्दूच नव्हे तर सर्वच भारतीय भाषांमध्ये 'वंदे मातरम' सारख्या प्रेरक गीताचा अर्थ उलगडून सांगणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी केंद्र सरकार कडे डोळे लावण्याचे काय कारण? आजवर अनेकदा 'वंदे मातरम' वरून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. यादरम्यान एकही उर्दू विद्वानाला हे काम करावेसे का वाटले नाही? देशातीलच नव्हे तर जगभरातील सर्वभाषिक हिंदू 'वंदे मातरम' विषयी आदर बाळगतात. त्या सर्वांनाच या गीतातील प्रत्येक शब्दाचा अर्थ माहित आहे असे नाही. मग भारतीय मुस्लिम नेत्यांना याचे वावडे का वाटावे? म्हणजेच हा वाद भाषाविषयक नसून राष्ट्राभक्तीच्या भावनेशी संलग्न आहे असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.
अनेकांचा असा 'गैर'समज आहे की, विदेशी भाषा आहे. मात्र उर्दू ही देखील मूळ भारतीय भाषाच आहे. तुर्की सत्ताधीशांनी भारतीय सैनिकांशी व अन्य प्रशासनिक अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याकरीता तयार केलेली भाषा म्हणजे 'उर्दू'. या भाषेवर फारसी, तुर्की, अरबी व हिंदी भाषेचा प्रभाव आहे. या भाषेचा प्रसार भारतीय उपखंडातच मोठ्या प्रमाणात झाला. प्रचलित भारतात व पाकिस्तानातच या भाषेला 'राजभाषेचा' दर्जा आहे. अतिशय रसाळ भाषा म्हणून हिचे वर्णन केले जाते. उर्दू मध्ये बरेच अभिजात साहित्य सुद्धा उपलब्ध आहे. या भाषेचा दु:स्वास करण्याचे खऱ्या भारतीयाला काहीच कारण नाही.
मात्र या देशातील अन्य भाषांचा आदर मुस्लिमांनीही केला तर काय बिघडले? पण ही भाषा जणू एका धर्माची अधिकृत भाषा असा आभास निर्माण करण्याचे षडयंत्र काही मंडळी रचत आहेत असेच दिसते आहे. सध्या भारतात सुमारे १६ कोटी मुस्लिम रहातात. यातील किती मुस्लिमांची मातृभाषा 'उर्दू' आहे याचे नेमके उत्तर देणे मुस्लिम नेत्यांना सुद्धा कठीण आहे. खर तर भारतातील बव्हंशी मुस्लिमांचे पूर्वज हे भारतीय अथवा हिंदूच असल्यामुळे त्यांची नाळ ही स्वाभाविकपणे भारतीय संस्कृतीशी जोडली गेली आहे. बंगाली मुस्लिम हे बंगाली भाषेचा अभिमान बाळगतात. केरळी मुस्लिम व्यवहारात 'मल्याळम' भाषेचाच वापर करतात. कोकणी मुसलमान 'कोकणी'चा वापर करतात. एखाद्या व्यक्तीवर अथवा समाजावर एखादी भाषा लादायचा प्रयत्न केला असता काय होते याचा पुरावा म्हणजे बांग्लादेशाची निर्मिती होय. भारतीय मुस्लिम पुढाऱ्यांनी नेतृत्व करताना अशी उदाहरणे अभ्यासण्याची नितांत गरज आहे.

'विविधतेतून एकता' हे भारतीय गुणवैशिष्ट्यच या नेत्यांना जाचत असावे. नाहीतर 'वंदे मातरम' चे भाषांतर करा अशी मागणीच त्यांनी केली नसती. खरे तर मुस्लिमांचा धर्मग्रंथ 'कुरआन ए शरीफ' हा ग्रंथ मूळ अरबी भाषेत आहे. आज शेकडो वर्षांनंतरही तो अरबी भाषेतूनच शिकवला जातो. त्यात काय लिहिले आहे याचा अर्थ समजून घेण्यासाठी सर्व जगातील मुस्लिमांना अरबी शिकवले जाते. अपवाद फक्त 'तुर्कस्तान'चा या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारक व तुर्की राष्ट्रवादाचे उद्गाते 'केमाल पाशा' यांनी त्यावेळच्या प्रस्थापितांना नाकारत पवित्र 'कुरआन ए शरीफ' चे तुर्कीत भाषांतर करवले. भारतीय मुस्लिम नेते अशी मागणी करायचे तरी धाडस दाखवतील काय?

याला प्रतिवाद केला जाईल की,'कुरआन ए शरीफ' हा आमचा धर्मग्रंथ आहे. आमच्या श्रद्धेचा विषय आहे. मग 'वंदे मातरम' यांच्या श्रद्धेचा विषय होऊ शकत नाही का? हा देश आमचाही आहे असा दावा करताना या देशाचे गुणगान करताना लाज कसली?

No comments:

Post a Comment